तुमच्या आत्मजागृतीचा प्रवास सुरु करा!
आत्मभान ध्यानसाधना, योगासन आणि प्राणायाम निवासी शिबीर चौकशी करानोंदणी कराअध्यात्म आणि विज्ञान या दोन्हींची विशेष सांगड घालत ध्यानमार्गावर ‘वैज्ञात्मिक अनुभूती’ साठी सिद्ध होऊया, आयुष्य सोपं करूया!
दिनांक: ४ ते ७ एप्रिल, २०२५
३ दिवस – ३ रात्री निवासी शिबीर
स्थळ: मेघमल्हार अॅग्रो रिसॉर्ट, होतले गाव, पौड-हडशी रस्ता, पुणे.
मूळ शुल्क: ₹ 21,000
त्वरित नोंदणी केल्यास विशेष शुल्क: ₹ 15,000
आमच्याशी संपर्क साधा
खालीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर “होय” असल्यास हे शिबीर तुमच्यासाठी आहे!
आयुष्य खूप गुंतागुंतीचं आणि अवघड झाल्यामुळे तणाव वाटतो का?
आयुष्य खूप गुंतागुंतीचं आणि अवघड वाटते का?
तुम्हाला कधी-कधी खूप थकल्यासारखे वाटते का?
तुम्हाला नेहमीच मानसिक, शारीरिक तणाव जाणवतो का?
एक अनोखा ब्रेक चाकोरीमधून हवा-हवासा वाटतो आहे का?
आत्मभान व आनंद खऱ्या अर्थाने अनुभूतीची खूप गरज वाटते आहे का?
शाश्वत मनःशांतीसाठी एक दुवा निर्मित करणारी, बंधुता वृद्धी करणारी, साधना मार्गावर निरंतर राखणारी कम्युनिटी मिळावी असे वाटते का?
जर हे प्रश्न तुमच्या सजग मनामध्ये निर्मित झालेले असतील, तर नक्कीच “आत्मभान ध्यान साधना निवासी शिबीर ” केवळ तुमच्यासाठीच आहे असे समजायला हरकत नाही. उपरोक्त प्रश्नांची उकल आणि आयुष्य सोपं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर तुम्ही नक्कीच, लगेच “आत्मभान निवासी ध्यान शिबीरासाठी” आजच नोंदणी केल्याशिवाय राहणार नाही.
तुम्ही “आत्मभान ध्यानसाधना, योगासन आणि प्राणायाम निवासी शिबीर” यात का सहभागी व्हावे?
- अंतर्सृष्टीची जाणीव व आत्मजागृतीचा अनुभव मिळविण्यासाठी
- ध्यानसाधनेचा सर्वात सोपा व प्रभावी मार्ग शिकण्यासाठी
- आंतरिक शक्ती आणि सामर्थ्य समजून घेण्यासाठी
- जीवनाचा उद्देश शोधणे आणि ते साध्य करण्याचा मार्ग निश्चित करण्यासाठी
- स्वतःच्या सच्चिदानंद स्वरुपाशी जोडले जाण्यासाठी
- स्वतःची संपूर्ण जबाबदारी स्वीकारुन, परिवर्तनाची कास धरण्यासाठी
आत्मभान ध्यानसाधना, योगासन आणि प्राणायाम निवासी शिबीरामध्ये काय-काय अंतर्भूत आहे?
- आत्मभान जीवनशैलीचा सविस्तर अभ्यास
- आत्मभान श्वास शुद्धीकरण प्रक्रिया प्रशिक्षण व सराव
- आत्मभान योग साधना प्रशिक्षण व सराव
- आत्मभान ध्यान साधना प्रशिक्षण व सराव
- महर्षी पतंजली योग ज्ञानसत्र
- आत्मभान नित्य साधना
- सह्याद्रीच्या निकट निर्सगाच्या सान्निध्यात शांती अनुभव
- सात्विक अन्नसेवनाचा अपूर्व अनुभव
- कौटुंबिक वातावरणामध्ये जुन्या पारंपरिक वाड्यामध्ये निवास
आत्मभान निवासी ध्यान शिबीर सर्व सहभागींसाठी विशेष का?
- आयुष्य सोपं करुया चळवळीचे प्रवर्तक, मानसशास्त्राचे अभ्यासक, अध्यात्मिक मार्गदर्शक, आंतरराष्ट्रीय कोच, लेखक आणि आत्मभान अकॅडेमिचे संस्थापक ध्यानगुरु अश्विन यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन व सहवास सर्व साधकांना मिळणे हीच आत्मभान निवास ध्यान शिबीरामधील सर्वात विशेष उपलब्धी होय!
- तुमचे बोट धरत, अत्यंत प्रेमाने सहजसुंदर भाषेत, रोजच्या जीवनामधील विविध उदाहरणं देत आयुष्य सोपं कसं करायचं हे शिकावं, फक्त ध्यानगुरु अश्विन यांच्याकडूनच. क्षण-क्षणाला ध्यानाची गोडी वाढवणं आणि रसाळ वाणीचा स्वाद घेणं म्हणजेच एक विशेष साक्षात्कार होय.
- रोजच्या धकाधकीच्या, गुंतागुंतीच्या आयुष्यामधून एक ब्रेक घेणं आणि त्यानंतर आश्रमाप्रमाणे अत्यंत पोषक वातावरणामध्ये समर्पित भावनेने असे निवासी शिबीर करायला सुद्धा त्या परमशक्तीने तुम्हाला प्रेरणा देणं हेच विशेष.
- शुद्ध शाकाहारी, सात्विक, समयोचित, सुग्रास भोजन तेसुद्धा प्रत्यक्ष भूमातेच्या कृपेने समक्षच पिकवलेल्या भाज्या, फळं आणि अन्नापासून म्हणजे पर्वणीच नव्हे काय!
- वैज्ञात्मिक अनुभूतीचा अपूर्व सोहळा म्हणजेच आत्मभान निवासी ध्यान शिबीर.
दिनांक:
४ ते ७ एप्रिल २०२५
स्थळ:
मेघमल्हार ऍग्रो रिसॉर्ट, होतले गाव, पौड-हडशी रस्ता, पुणे.
प्रशिक्षक:
ध्यानगुरु अश्विन
आत्मभान ध्यानसाधना, योगासन आणि प्राणायाम निवासी शिबीर सर्व सहभागींसाठी विशेष का?
या प्रश्नाचे उत्तर शिबिराचे प्रशिक्षक श्री अश्विन देशपांडे कोण आहेत या प्रश्नामध्ये दडले आहे.
श्री. अश्विन देशपांडे 30 वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय NLP ट्रेनर, प्रोफेशनल सर्टिफाईड बिझनेस अँड एक्सिक्युटीव्ह कोच, वक्ता आणि कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून कार्य करत आहे. अनेक दशकांपासून मानवी मानसशास्त्र, मानवी वर्तन आणि चेतन – अचेतन मन यांच्या अभ्यासासोबतच वेद, उपनिषदे, पुराण, श्रीमद् भगवद्गीता, पतंजली योगसूत्रे, जगद्गुरू आदि शंकराचार्य यांच्या विविध रचना अशा अनेकविध ग्रंथांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे.
अश्विन यांनी ‘आयुष्य सोपं करूया’ या चळवळीची सुरुवात केली व त्या माध्यमातून दहा लाखांहून अधिक लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणले आहेत. त्यांचे निर्देशित ध्यानाचे प्रशिक्षण कार्यक्रम आणि त्यांचे अध्यात्मिक शिकवणीद्वारे त्यांनी अनेक लोकांना आंतरिक आनंद आणि आत्मजागृतीचा मार्ग दाखवला आहे.
या शिबिरात तुम्हाला श्री. अश्विन देशपांडे यांच्या सहवासात आत्मभान, आत्मजागृती यांच्याशी निगडित आणि अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक गोष्टी जाणून घ्यायला, शिकायला मिळतील. त्यामुळे हे निवासी शिबीर तुमच्यासाठी आत्मविकासासाठी सुवर्णसंधीच ठरेल.
श्री. अश्विन तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन करतील, तुमचा हात धरून मुक्तीच्या आणि आत्मजागृतीच्या मार्गावर घेऊन जातील. अश्विन सर तुम्हाला एक नवी जीवनशैली आत्मसात करण्यासाठी आणि स्वतः बद्दल अधिक जागरूक होण्यासाठी निश्चितच प्रोत्साहित करतील!
शिबीराच्या स्थळाबद्दल:
मेघमल्हार ऍग्रो रिसॉर्ट, होतले, पौड-हडशी रस्ता, पुणे.
शांततेचा अनुभव
सह्याद्रीच्या हिरव्या डोंगररंगानी वेढलेले रिसॉर्ट
पारंपरिक वाड्यात निवास
चारही बाजूंनी आंब्याच्या बागांनी वेढलेला वाडा
सात्विक जीवनशैलीचा अनुभव
शुद्ध शाकाहारी – आरोग्यदायी, स्वच्छ आणि घरगुती भोजन
आत्मभान ध्यान साधना निवासी शिबीर
दिनांक:
४ ते ७ एप्रिल २०२५
स्थळ:
मेघमल्हार ऍग्रो रिसॉर्ट, होतले गाव, पौड-हडशी रस्ता, पुणे.
प्रशिक्षक:
ध्यानगुरु अश्विन
ऊर्जा अनुभूती शुल्क: ₹ 21000/-
त्वरित नोंदणी केल्यास:
विशेष शुल्क ₹ १५०००/-
या शुल्कामध्ये समाविष्ट आहे:
- पारंपरिक वाड्यात निवास (एका नॉन – AC रूममध्ये २ व्यक्ती)
- शुद्ध शाकाहारी भोजन – नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता व चहापान आणि रात्रीचे जेवण
- प्राणायाम, निर्देशित ध्यान व योगासनाचे सत्र
या शुल्कामध्ये समाविष्ट नाही:
- प्रवासाचा खर्च
अत्यंत महत्वाचे:
- वय: 14 वर्षे आणि त्याहून अधिक (आधार कार्डची प्रत अनिवार्य आहे.)
- प्रशिक्षणाची भाषा मुख्यत्वे ‘मराठी’ असेल.
- कोणत्याही गंभीर आजारांनी ग्रस्त असलेले लोक प्रतिबंधित.
- पूर्वनोंदणी आणि शिबीर सुरु होण्यापूर्वी 100% शुल्क भरणे आवश्यक.
- रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. शुल्क भरण्यासाठी UPI, क्रेडिट कार्ड्स, नेट बँकिंग, चेक यापैकी कुठल्याही पद्धतीचा वापर करू शकता.
आत्मभान ध्यानसाधना, योगासन आणि प्राणायाम निवासी शिबीर
साधारण दिनचर्या
Time
- 6:00 AM to 7:00 AM
- 7:00 AM to 8:00 AM
- 8:00 AM to 9:00 AM
- 9:00 AM to 10:00 AM
- 10:00 AM to 11:30 AM
- 11:30 AM to 11:45 AM
- 11:45 AM to 1:00 PM
- 1:00PM to 2:00 PM
- 2:00 PM to 3:30 PM
- 3:30 to 4:00 PM
- 4:00 PM to 5:30 PM
- 5:30 PM to 5:45 PM
- 5:45 PM to 7:45 PM
- 7:45 PM to 8:45 PM
- 8:45 PM
Particulars
- आत्मभान श्वास क्रिया (प्राणायाम)
- आत्मभान ध्यान साधना
- आत्मभान योग्य साधना
- सकाळचा नाश्ता
- आत्मभान ध्यान साधना प्रशिक्षण
- ब्रेक
- आत्मभान ध्यान साधना प्रशिक्षण
- दुपारचे भोजन
- आराम
- चहा
- आत्मभान साधना प्रगल्भता सत्र
- ब्रेक
- मंत्र, श्लोक, अध्यात्मिक संगीत साधना
- रात्री भोजन
- निद्रा समय
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
आत्मभान ध्यानसाधना, योगासन आणि प्राणायाम निवासी शिबीराचा कालावधी काय?
३ दिवस – ३ रात्री. दि. ९ जानेवारी ते १२ जानेवारी, २०२५ या कालावधीमध्ये हे निवासी शिबीर होईल.
आत्मभान ध्यानसाधना, योगासन आणि प्राणायाम निवासी शिबीराचे प्रशिक्षक कोण आहेत?
या शिबीराचे प्रशिक्षक श्री. अश्विन देशपांडे हे असतील. ‘ध्यानगुरू’ म्हणून ओळख लाभलेले श्री. अश्विन देशपांडे यांनी ‘आत्मभान’ ध्यानपद्धती तयार केली आहे. त्यांचा वेद, उपनिषदे, पुराण, श्रीमद् भगवद्गीता, पतंजली योगसूत्रे, जगद्गुरू आदि शंकराचार्य यांच्या विविध रचना इ. चा सखोल अभ्यास आहे.
आत्मभान ध्यानसाधना, योगासन आणि प्राणायाम निवासी शिबीरामध्ये राहण्याची व्यवस्था काय आहे?
शिबीराच्या कालावधीत मेघ मल्हार ॲग्रो रिसॉर्टमध्ये राहण्याची सोय केली जाईल. एका नॉन – AC रूममध्ये २ व्यक्ती अशा पद्धतीने सहभागींच्या आरामदायी निवासाची सुविधा असेल ज्यामुळे ध्यान आणि विश्रांतीसाठी अनुकूल वातावरण मिळेल.
आत्मभान ध्यानसाधना, योगासन आणि प्राणायाम निवासी शिबीरासाठी मी सोबत काय आणावे?
शिबीरासाठी येताना ध्यान, योगासन व प्राणायाम यासाठी योग्य, आरामदायक कपडे, आवश्यक गोळ्या व औषधे, वैयक्तिक गरजेच्या वस्तू , त्यांना आवडणारे कोणतेही वैयक्तिक ध्यान साधने किंवा कुशन व नोट्स घेण्यासाठी वही व पेन आणावे.
आत्मभान ध्यानसाधना, योगासन आणि प्राणायाम निवासी शिबीरासाठी काही विशिष्ट नियम आहेत?
शिबीरासाठी आलेल्या प्रत्येकाने वेळापत्रकाचे व प्रशिक्षकांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे. यामध्ये शांतता, सोबतच्या शिबिरार्थींशी आदरयुक्त वागणूक आणि विविध सत्रांसाठी वेळेवर उपस्थिती याविषयीच्या सूचनांचा समावेश असेल.
आत्मभान ध्यानसाधना, योगासन आणि प्राणायाम निवासी शिबीर कुठे होणार आहे?
हे शिबीर मेघमल्हार अॅग्रो रिसॉर्ट, होतले गाव, पौड-हडशी रस्ता, पुणे याठिकाणी होणार असून पुणे शहरापासून हे ठिकाण अंदाजे ३८ किमी अंतरावर आहे.
आत्मभान ध्यानसाधना, योगासन आणि प्राणायाम निवासी शिबीराचा उद्दिष्ट काय आहे?
या शिबीराचे उद्दिष्ट आहे की सहभागींना ध्यानधारणेचा अनुभव प्रदान करणे, आंतरिक शांती, सजगता आणि आत्म-जागरूकता विकसित करण्यासाठी तंत्र आणि पद्धती शिकवणे.
आत्मभान ध्यानसाधना, योगासन आणि प्राणायाम निवासी शिबीरामध्ये सहभागी होण्यासाठी अनुभव आवश्यक आहे का?
हे शिबीर सर्व अनुभव स्तरावरील व्यक्तींसाठी खुले आहे, तुम्ही या क्षेत्रात नवीन असाल किंवा वर्षानुवर्षे सराव करत असाल.
आत्मभान ध्यानसाधना, योगासन आणि प्राणायाम निवासी शिबीरादरम्यान जेवण दिले जाईल का?
होय, शिबीराच्या संपूर्ण कालावधीत पौष्टिक शाकाहारी जेवण दिले जाईल. तुम्हाला आहारातील काही प्रतिबंध किंवा ऍलर्जी असल्यास कृपया आम्हाला आधी माहिती द्यावी.
मी आत्मभान ध्यानसाधना, योगासन आणि प्राणायाम निवासी शिबीरासाठी कशी नोंदणी करावी?
शिबीरासाठी नोंदणी करण्यासाठी कृपया ‘आत्मभान’ च्या वेबसाईटला भेट द्या किंवा आम्हाला थेट संपर्क करा. जागा मर्यादित असल्यामुळे कृपया लवकरात लवकर नोंदणी करून विशेष सवलतीचा लाभ घ्यावा.
दिनांक:
४ ते ७ एप्रिल २०२५
स्थळ:
मेघमल्हार ऍग्रो रिसॉर्ट, होतले गाव, पौड-हडशी रस्ता, पुणे.
प्रशिक्षक:
ध्यानगुरु अश्विन
Get In Touch with us
Step Into a Transformed Future
Join our community of empowered individuals who have embarked on a journey of self-discovery, growth, and impact. It’s time to script your success story with Atmabhan Academy
Call us On:
8108166766
8767852090
Mail us at:
Office Hours:
Mon-Fri: 9am – 7pm
Sat-Sun: 10am – 3pm
Follow Us:
All Rights Reserved | Atmabhan Academy LLP | Privacy Policy
This Website is Encrypted and your information is 100% Safe
All Payments Supported by RazorPay Payment Gateway
Website Designed & Developed by Creafinity LLP
Ashvin Deshpande’s NLP EDGE Model
Global Certification Standards










