
निर्देशित ध्यानाचा सर्वोत्तम अनुभव
आत्मभान ध्यान साधना प्रशिक्षण शिबीर
– श्री. अश्विन देशपांडे
रविवारी, ९ मार्च, २०२५ रोजी
सकाळी ७ ते १०
LIVE on ZOOM
नोंदणी शुल्क फक्त ₹३००
नावनोंदणीसाठी फॉर्म
निर्देशित ध्यान म्हणजे नेमके काय?
आत्मभान निर्देशित ध्यान प्रशिक्षण शिबीर हा आत्मभानच्या ध्यान, ज्ञान, भावना आणि शरीरस्वास्थ्य या घटकांच्या व्यापक पटलावरचा एक लहानसा भाग आहे. हा तीन तासांचा निर्देशित ध्यानाचा अनुभव तुमच्या मन, बुद्धी, आत्मा आणि शरीर या चारही घटकांकडे साक्षीभावाने, आत्मभानावर येत पाहण्याचा दृष्टिकोन देईल.
‘आत्मभान’ म्हणजे काय, असा प्रश्न सर्वप्रथम डोळ्यासमोर उभा राहतो. आत्मभान म्हणजे वर्तमानकाळात, त्या क्षणात सातत्याने, जागृतपणे अंतरसृष्टीत व बाह्यसृष्टीत काय सुरु आहे याचे भान असणे. मग आपल्या अंतरातल्या आणि बाह्य परिस्थितीला भान असणे खरेच इतके कठीण आहे का, हाही प्रश्न मनात डोकावून जातो. ध्यानगुरू अश्विन देशपांडे म्हणतात की मनुष्य त्याच्या आयुष्यात ९८% वेळेस बेशुद्धीतच जगत असतो, त्याला भानावर यावे लागते, त्याला चेतनजागृती करावी लागते. त्यासाठी ज्ञानसाधनेसोबतच ध्यानसाधना आवश्यक ठरते. चेतनाजागृतीसोबतच रोजच्या आयुष्यातील अनेक समस्या जसे की अतिविचार, ताणतणाव, एकाग्रतेची कमतरता, आत्मविश्वास नसणे यापासून ते विविध शारीरिक समस्यांचे समाधान करण्याची किमया ध्यानसाधनेने साधता येते.
आता ‘निर्देशित ध्यान’ म्हणजे काय?
ध्यानाच्या बाबतीत असा उगाच एक समज आहे की एखादं आसन घेतलं, मुद्रा केली आणि डोळे मिटले की ध्यान साध्य झालं, पण ते इतकं सहजसाध्य नाही. ध्यान ही एक साधना आहे, जी साधता साधता साधते. त्यामुळे ध्यानाचा प्रवास सुरु करताना त्या मार्गावर कोणीतरी वाटाड्या हवाच, guide हवाच. ‘निर्देशित ध्यान’ (Guided Meditation) म्हणजे अशी ध्यानपद्धती जिथे ध्यान करत असताना तुमचे Guide, तुमच्या निर्देशक ध्यान करताना प्रत्येक पावलावर येणाऱ्या विविध समस्यांवरील समाधान शोधण्यासाठी मदत करतात. ‘आत्मभान’ ध्यानक्रियेमध्ये निर्देशक ध्यानगुरू अश्विन देशपांडे तुमच्या मनाला, बुद्धीला, शरीराला सूचना देऊन, तुमच्या स्वयंसूचनेच्या व्यवस्थेला जागृत करून, तुम्हाला ध्यानाच्या, आत्मभानाच्या मार्गावर एक एक पाऊल पुढे टाकण्यास मदत करते.
निर्देशित ध्यानाचा सर्वोत्तम अनुभव
LIVE on ZOOM
आत्मभान ध्यान साधना प्रशिक्षण शिबीर
– श्री. अश्विन देशपांडे
रविवारी, ९ मार्च २०२५
सकाळी ७ ते १०
निर्देशित ध्यानगुरु
श्री. अश्विन देशपांडे
श्री. अश्विन देशपांडे यांचा मानसशास्त्र, तत्वज्ञान, विविध ध्यानपद्धती व अध्यात्मिक क्षेत्र यासह अनेक विषयांचा सखोल अभ्यास असून, गेल्या ३० वर्षांपासून वरील विषयातील अनेक मुद्यांवर ते मार्गदर्शन करत आहेत. ते नेतृत्वगुण विकास व ‘आत्मभान’ ध्यानसाधना या दोन्ही क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक असून, ध्यानसाधना क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना ‘ध्यानगुरू’ म्हणून ओळख लाभली आहे.
त्यांचा विविध विषयातील सहज वावर, भाषाकौशल्य व ममत्वपूर्ण मार्गदर्शन यामुळे अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आल्याचे अनुभव आहेत.

आत्मभान निर्देशित ध्यान क्रिया
तीन तासांचा हा कार्यक्रम ज्यात ध्यानगुरू अश्विन देशपांडे यांचे विविध तात्विक, अध्यात्मिक विषयांवरील मार्गदर्शक विवेचन व ‘आत्मभान’ ध्यानसाधनेच्या सत्राचा समावेश असतो.
मन आणि मनाचे प्रकार, शरीर, बुद्धी, चेतना, आत्मा, ईश्वर यासहित अनेक विषयांवरील विश्लेषण व आत्मभान ध्यानसाधनेचे संपूर्णतः निर्देशित सत्र यामुळे
- विचारांचे संयमन करायला मदत होते, सकारात्मक विचार वाढीस लागतात.
- मनःशांतीचा मार्ग दिसू लागतो.
- वर्तमानात जगण्याचे भान येवू लागते.
- ताणतणाव आणि भीती कमी होऊ लागते, आत्मविश्वास वाढू लागतो.
- आयुष्य सोपे करण्यासाठी मार्गदर्शन लाभते.
या प्रशिक्षणात तुम्ही काय शिकाल?
ध्यान म्हणजे काय आहे, काय नाही?
ध्यानासंबंधित समज/गैरसमज
पतंजली महर्षी अष्टांग योग
साधनेतील अडथळे
व्यक्तित्वाची जडणघडण
मनाची कार्यप्रणाली
मनाची सात मजली इमारत
चेतना म्हणजे काय?
आत्मभान ध्यान साधनेचे 5As
आत्मभान ध्यान साधनेची ओळख
कार्यक्रम केलेल्यांच्या प्रतिक्रिया
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
निर्देशित ध्यानसाधना म्हणजे काय?
निर्देशित ध्यानसाधना ही ध्यानाची एक शैली आहे ज्यामध्ये ध्यान मार्गदर्शक ध्यानादरम्यान निर्देश देत असतात, मार्गदर्शन करत असतात.
आत्मभान ध्यानसाधना करण्यासाठी ठराविक वयोमार्यादेची अट आहे का?
नाही, वयवर्षे १० च्या पुढील कुठलीही व्यक्ती आत्मभान ध्यानसाधना करू शकते.
आत्मभान ध्यानसाधना प्रशिक्षण शिबिराची नावनोंदणी कशी करायची व फीस कशी भरायची?
आत्मभानच्या वेबसाईटवरील फॉर्म व रुपये 3००/- नोंदणी शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरून नावनोंदणी करावी.
आत्मभान ध्यानसाधना प्रशिक्षण शिबिरासोबतच अजून कुठले उपक्रम घेतले जातात?
दैनंदिन ध्यानसत्र व निवासी शिबिर हे दोन मुख्य उपक्रम आत्मभान ध्यानसाधना प्रशिक्षण शिबिरासोबत घेतले जातात. दैनंदिन ध्यानसत्र सोमवार ते शुक्रवार, सकाळी ५:३० ते ६:३० यावेळेत होते, ज्याचे वार्षिक शुल्क रुपये २४००/- आहे. निवासी शिबिरांची माहिती आम्ही ‘आत्मभान’च्या सोशल मीडिया व वेबसाइटवर आम्ही वेळोवेळी अपडेट करत असतो.
मला आत्मभान ध्यानसाधना शिकायची आहे पण नोकरी/व्यवसाय यामुळे वेळ मिळत नाही. कृपया मार्गदर्शन करावे?
आत्मभान ध्यानसाधना प्रशिक्षण शिबिर रविवारी सकाळी ७ ते १० या वेळेत असते तसेच दैनंदिन ध्यानसत्र सोमवार ते शुक्रवार, सकाळी ५:३० ते ६:३० या वेळेत असते, त्यामुळे तुमच्या नोकरी/व्यवसायाच्या वेळापत्रकात बदल न करता तुम्ही आत्मभान ध्यानसाधना शिकू शकता.
आत्मभान ध्यानसाधना प्रशिक्षण शिबिराची फीस भरून उपस्थित राहू न नसल्यास रेकॉर्डेड सेशन उपलब्ध होऊ शकतात का?
नाही, आत्मभान ध्यानसाधना प्रशिक्षण शिबिराची फीस भरून उपस्थित राहू न नसल्यास रेकॉर्डेड सेशन उपलब्ध होऊ शकत नाही.
