रोजच्या जगण्यातील शेकडो समस्या, तुम्हाला
अतिविचार किंवा अविचाराने मन ग्रासले आहे असे वाटते.
तर्क आणि भावनांचा समतोल साधता येत नाही.
मन, बुद्धी, शरीर यांच्या सुदृढतेसाठी काय करावे ते कळतं नाही.
आयुष्यात सगळं अवघडच आहे असे कायम वाटते.
भूतकाळातील घटनांचे पश्चात्ताप आणि भविष्याची चिंता मनात सतत जागे असतात असे वाटते.
ताणतणाव, भीती, न्यूनगंड यामुळे सतत हातून काहीतरी निसटत आहे असे वाटते.
या समस्यांना सोडवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करण्याची धडपड करत आहात?
मग या…. ‘आत्मभान’ ध्यानसाधनेसोबत या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करूया.
ध्यान करणे अजूनही जमत नाही?
अनेकांसाठी नियमितपणे ध्यानसाधना करणे काहीसे कठीण असते. योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाअभावी प्रगतीतील हे अडथळे दूर करणे कठीण होते आणि त्यातून निराशा येते. त्यामुळे निर्देशित ध्यानाचे महत्त्व जाणून घ्या आणि ध्यान करताना सर्वसाधारणपणे जाणवणाऱ्या अडथळ्यांवर मात करा.
‘आत्मभान ध्यानसाधना’ का?
‘आत्मभान’ या नावातच या ध्यानसाधनेचे गुपित आहे. स्वतःला जाणून घेण्याच्या, स्वतःच्या मनाला, आत्म्याला, शरीराला भानावर आणण्याच्या प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यासाठी आत्मभान ध्यानसाधना निश्चितच मदत करते.
आत्मभान ध्यान शिबिरामध्ये आजवर सहभागी झालेल्या शेकडो लोकांचा अनुभव सांगतो की त्यामुळे मन:शांती, विचारांतील स्पष्टता, भावनिक स्थिरता आणि सजकता वाढते, ताण तणाव कमी होतो, चेतना शक्तीची वाढ होते.
अविचार किंवा अतिविचार बाजूला करून मनाच्या शांततेसाठी आत्मभान ध्यानसाधना करूया!
आत्मभान ध्यानसाधना प्रशिक्षण शिबिर
तीन तासांचा हा कार्यक्रम ज्यात ध्यानगुरू अश्विन देशपांडे यांचे विविध तात्विक, अध्यात्मिक विषयांवरील मार्गदर्शक विवेचन व ‘आत्मभान’ ध्यानसाधनेच्या सत्राचा समावेश असतो.
मन आणि मनाचे प्रकार, शरीर, बुद्धी, चेतना, आत्मा, ईश्वर यासहित अनेक विषयांवरील विश्लेषण व आत्मभान ध्यानसाधनेचे संपूर्णतः निर्देशित सत्र
विचारांचे संयमन करायला मदत होते, सकारात्मक विचार वाढीस लागतात.
मनःशांतीचा मार्ग दिसू लागतो.
वर्तमानात जगण्याचे भान येवू लागते.
ताणतणाव आणि भीती कमी होऊ लागते, आत्मविश्वास वाढू लागतो.
आयुष्य सोपे करण्यासाठी मार्गदर्शन लाभते.
आत्मभान निर्देशित ध्यानसाधना पद्धती जाणून घ्या, तिच्या सकारात्मक परिणामांचा लाभ घ्या….
अंतर्मनाचा वेध घ्या, मन:शांतीच्या प्रवासाला सुरुवात करा!
आत्मभान ध्यानसाधना प्रशिक्षण शिबिरामध्ये भाष्य केले जाणारे मुद्दे
ध्यान म्हणजे काय नाही?
ध्यानासंबंधित समज/गैरसमज
पतंजली महर्षी अष्टांग योग
साधनेतील अडथळे
व्यक्तित्वाची जडणघडण
मनाची कार्यप्रणाली
मनाची सात मजली इमारत
चेतना म्हणजे काय?
आत्मभान ध्यान साधनेचे 5As
आत्मभान ध्यान साधनेची ओळख
मार्गदर्शक
श्री. अश्विन देशपांडे
श्री. अश्विन देशपांडे यांचा मानसशास्त्र, तत्वज्ञान, विविध ध्यानपद्धती व अध्यात्मिक क्षेत्र यासह अनेक विषयांचा सखोल अभ्यास असून, गेल्या ३० वर्षांपासून वरील विषयातील अनेक मुद्यांवर ते मार्गदर्शन करत आहेत. ते नेतृत्वगुण विकास व ‘आत्मभान’ ध्यानसाधना या दोन्ही क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक असून, ध्यानसाधना क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना ‘ध्यानगुरू’ म्हणून ओळख लाभली आहे.
त्यांचा विविध विषयातील सहज वावर, भाषाकौशल्य व ममत्वपूर्ण मार्गदर्शन यामुळे अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आल्याचे अनुभव आहेत.
अनुभूती
आजच नोंदणी करा!
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
निर्देशित ध्यानसाधना म्हणजे काय?
निर्देशित ध्यानसाधना ही ध्यानाची एक शैली आहे ज्यामध्ये ध्यान मार्गदर्शक ध्यानादरम्यान निर्देश देत असतात, मार्गदर्शन करत असतात.
आत्मभान ध्यानसाधना करण्यासाठी ठराविक वयोमार्यादेची अट आहे का?
नाही, वयवर्षे १० च्या पुढील कुठलीही व्यक्ती आत्मभान ध्यानसाधना करू शकते.
आत्मभान ध्यानसाधना प्रशिक्षण शिबिराची नावनोंदणी कशी करायची व फीस कशी भरायची?
आत्मभानच्या वेबसाईटवरील फॉर्म व रुपये १००/- नोंदणी शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरून नावनोंदणी करावी.
आत्मभान ध्यानसाधना प्रशिक्षण शिबिरासोबतच अजून कुठले उपक्रम घेतले जातात?
दैनंदिन ध्यानसत्र व निवासी शिबिर हे दोन मुख्य उपक्रम आत्मभान ध्यानसाधना प्रशिक्षण शिबिरासोबत घेतले जातात. दैनंदिन ध्यानसत्र सोमवार ते शुक्रवार, सकाळी ५:३० ते ६:३० यावेळेत होते, ज्याचे वार्षिक शुल्क रुपये ६००/- आहे. निवासी शिबिरांची माहिती आम्ही ‘आत्मभान’च्या सोशल मीडिया व वेबसाइटवर आम्ही वेळोवेळी अपडेट करत असतो.
मला आत्मभान ध्यानसाधना शिकायची आहे पण नोकरी/व्यवसाय यामुळे वेळ मिळत नाही. कृपया मार्गदर्शन करावे?
आत्मभान ध्यानसाधना प्रशिक्षण शिबिर रविवारी सकाळी ७ ते १० या वेळेत असते तसेच दैनंदिन ध्यानसत्र सोमवार ते शुक्रवार, सकाळी ५:३० ते ६:३० या वेळेत असते, त्यामुळे तुमच्या नोकरी/व्यवसायाच्या वेळापत्रकात बदल न करता तुम्ही आत्मभान ध्यानसाधना शिकू शकता.
आत्मभान ध्यानसाधना प्रशिक्षण शिबिराची फीस भरून उपस्थित राहू न नसल्यास रेकॉर्डेड सेशन उपलब्ध होऊ शकतात का?
नाही, आत्मभान ध्यानसाधना प्रशिक्षण शिबिराची फीस भरून उपस्थित राहू न नसल्यास रेकॉर्डेड सेशन उपलब्ध होऊ शकत नाही.